शानभाग विद्यालयाच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

सातारा- येथील श्याम सुंदरी रिलीजियस अँड चॅरिटेबल सोसायटीच्या के.एस.डी.शानभाग  विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या   तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय आर्चरी म्हणजेच धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे सोलापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये विद्यालयाचा इयत्ता दहावी मध्ये शिकणारा युवराज प्रवीण चव्हाण हा सेकंड रँक ने निवडला गेला तसेच इयत्ता नववी ब मध्ये शिकणारा शारीर राजेंद्र माने याची तिसऱ्या रँक साठी निवड झाली आणि इयत्ता आठवी अ मध्ये शिकणाऱ्या कु सिद्धी शिवाजी पाटील या मुलीची चौथ्या रँक साठी निवड करण्यात आली आहे या खेळाडूंना विद्यालयाचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक धनश्री जाधव यांचे प्रशिक्षण लाभले या निवडीबद्दल तसेच या तिघांनी केलेल्या अतिशय नेत्रदीपक कामगिरीबद्दल के.एस.डी.शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश  शानभाग ,संस्थेच्या संचालिका सौ.आंचल घोरपडे, विद्यालयाच्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि प्राचार्य सौ .रेखा गायकवाड प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे अध्यक्ष ,प्रतिनिधी, शिक्षक, शिक्षिका व पालकांनी या यशाबद्दल कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त