ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

सातारा : क्रीडा व युवकसेवा संचलनालंय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा वतीने जागतिक ऑलिम्पिक दिननिमित्त विविध खेळाच्या स्पर्धा चर्चासत्र परिसंवाद व कार्यशाळा आयोजन दि.23 जून 2024 सकाळी 10 वाजता  श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा करण्यात आले। यावेळी विविध खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी श्रीमंत छत्रपती वृषाली राजे भोसले यांचे हस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांचे अध्यक्षतेखाली तसेच कला क्रीडा महासंघ राज्य कार्याध्यक्ष सुनील जाधव यांचे उपस्थितीत संपन्न झाला 
       जगातील सर्वोत्तम क्रीडा महोत्सव ऑलिम्पिक ची स्थापना ग्रीस येथे दि 23 जून 1894 साली पियरे डी कौबटिन यांनी केली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती तसेच जगातील सुमारे 200 पेक्षा अधिक देशाचे ऑलिम्पिक संघ हे जागतिक ऑलिम्पिक समितीच्या स्थापनेचा दिवस म्हणून 23 डे रोजी ऑलिम्पिक दिन साजरा करतात.
   सातारा जिल्ह्याचे सुपुत्र ऑलिम्पिकवीर स्व खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले त्याचा वारसा घेऊन जिल्ह्यातील खेळाडूनी ऑलिम्पिक पदक मिळवून सातारा जिल्हाचे नाव पुन्हा एखदा मोठे करतील अशी अपेक्षा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी व्यक्त केली 
    यावेळी खेळाडू, क्रीडा संघटना, प्रशिक्षक यांनी आपले विचार मांडले 
प्रमोद कदम यांनी सूत्रसंचालन केले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त