सातारा जिल्हा पोलीस दलांतर्गत मोठे फेरबदल..सातारा शहर पोलीस ठाण्याचे नवे कारभारी राजेंद्र मस्के

सातारा  : सातारा जिल्हा पोलीस दलाअंतर्गत मोठे फेरबदल झाले असून सातारा शहर पोलीस ठाण्याचे नवे कारभारी म्हणून राजेंद्र मस्के यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, कामगिरीचे सातत्य राखण्यात अपयशी ठरल्याने पोनि महेंद्र जगताप यांचा शहरचा कार्यकाळ संपण्याअगोदरच उचलबांगडी करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सोमवारी रात्री पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या. यामध्ये पोनि महेंद्र जगताप यांची कराड तालुका येथे बदली करण्यात आली आहे.

चार महिन्यांपूर्वी तत्कालीन पोनि हेमंतकुमार शहा यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे पोनि जगताप यांची लॉटरी लागली होती. सेवा कालावधी संपण्याअगोदरच त्यांच्या जागी पोनि राजेंद्र मस्के यांनी सूत्रे घेतली असून ते कोल्हापूर येथून आले आहेत. दरम्यान, पोनि राजेंद्र सावंत्रे हे कोल्हापूर येथून आले असून त्यांची शाहूपुरी पोलीस ठाण्यात वर्णी लागली आहे. पोनि जितेंद्र शहाणे हे सांगलीहून आले असून त्यांची वाई पोलीस ठाणे, तर पोनि घनश्याम सोनावणे हे विशेष सुरक्षा येथून आले असून त्यांची वडूज पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त