राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

वाई : २२ महाराष्ट्र  एन.सी.सी. बटालियन सातारा  आयोजीत  दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरास  25 मे 2023 रोजी प्रारंभ झाला आहे. या शिबिरात सातारा जिल्ह्यातून आलेल्या विविध शाळा, महाविद्यालयीन असे 525 विद्यार्थी -विद्यार्थिनींना सैन्य दलाचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येत आहे.यावेळी विविध मानयवरांचे मार्गदर्शन देखील होणार आहे,
    सैनिक स्कुल सातारा येथे होत असलेल्या या शिबिरात प्रारंभीच्या सत्रात छात्र सैनिकांना मार्गदर्शन करताना कँप कमांडर कर्नल दीपक  ठोंगे आपल्या म्हणाले,जीवनात उच्च धेय ठेऊन परिस्थितीशी संघर्ष करीत प्रामाणिक प्रयत्न केले तर जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यश मिळवता येते हेच या शिबिराच्या माध्यमातून शिकतात येते. 'ऐक्य व शिस्त' या NCC च्या बोधवाक्याप्रमाणेच एकता व शिस्त याची रुजवणूक करण्यासाठी त्याची कास धरून छात्र सैनिकांनी कठोर परिश्रम घेऊन सैनिकी शिस्तीचे पालन करीत लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून समाज व देशसेवेसाठी तत्पर रहावे असे आवाहन त्यांनी केले.
 10 दिवसाच्या  शिबिरात   छात्र सैनिकांना कठोर शारीरिक प्रशिक्षणा सोबत कवायत , ट्रेकिंग, मॅप रीडिंग व शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देऊन  फायरिंग करण्याची संधी दिली जाते. छात्र सैनिकांच्या शारीरीक विकासा- बरोबरच बौध्दिक, भावनिक आणि मानसिक विकासासाठी विशेष व्याख्यानांचे आयोजन केले जात आहे. शिबिराच्यावेळी झालेल्या व्याख्यानामध्ये  CPR या महत्वाच्या विषयावर  डॉ. अविनाश भोसले,डॉ.समीर सोहनी यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.डॉ. विजया कदम यांचे योगाचे जीवनातील महत्व, आहार नियोजन या विषयांवर व्याख्यान झाले. सायबर क्राईम या विषयावर प्रोफेसर गौरव वराडे याचे.सौ.अपर्णा बल्लाळ यांचे मानसिक आरोग्य,रक्त व त्या संदर्भात असणारे आजार या विषयी सौ.तेजस्विता दळवी यांनी मार्गदर्शन केले.
    ड्रिल, फायरिंग, शस्त्र प्रशिक्षण, शिस्त, लीडरशिप, आरोग्य, साहासिक  वृत्ती विकास व्हावा याविषयी कमांडिंग  ऑफिसर  कर्नल   दीपक  ठोंगे  व प्रशासन  अधिकारी  कर्नल  मोहन  भालसिंग, सुभेदार  मेजर  तापसे, यांनी  मार्गदर्शन केले.
कॅम्प कमांडर कर्नल दीपक ठोंगे साहेब व  कर्नल एम.व्ही भालशिंग यांच्या नेतृत्वाखाली सुभेदार मेजर सतीश तापसे आणि 22 महाराष्ट्र बटालियनचा आर्मी स्टाफ तसेच एन.सी.सी.ऑफिसर लेफ्टनंट समाधान शिंदे, लेफ्टनंट महेश जाधव ,चीफ ऑफिसर डी. जी. सोनावणे,फर्स्ट ऑफिसर बी जी कुंभार व सीमा जोशी,  केर टेकर CTO सौ.ऋतुजा वाळंजकर -शिंदे, श्वेता चव्हाण- माने.सुजाता ननावरे हे यशस्वी आयोजन करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त