राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अॅक्शन मोडवर: ठाकरे सरकारला पहिला झटका
शिवसेना आमदरांच्या बडंखोरीमुळे अडचणीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारला आता आणखी एक झटका बसला- Satara News Team
- Tue 28th Jun 2022 08:03 am
- बातमी शेयर करा
पाच दिवसात 280 जीआर 20 जून - 30 जीआर 21 जून - 81 जीआर 24 जून - 58 जीआर 22 जून - 54 जीआर 23 जून - 57 जीआर
सातारा न्यूज मुंबई :- शिवसेना आमदरांच्या बडंखोरीमुळे अडचणीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारला आता आणखी एक झटका बसला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहीत 22, 23 आणि 24 जूनला सरकारने मंजूर केलेल्या फाईल्स आणि प्रस्तावांचा तपशील मागवला आहे.
शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर आघाडी सरकारने अवघ्या 48 तासांत कोट्यवधी रुपयांचे 106 जीआर मंजूर करत निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी राज्यपालांना पत्रही लिहीत हस्तक्षेपाची मागणी केली होती.पण गेल्या आठवड्यात राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. दोन दिवसांपूर्वी ते कोरोनातून बरे होऊन राजभवनात दाखल झाले.त्यानंतर आता राज्यपालही अॅक्शन मोडवर आले आहेत.राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज्याच्या मुख्य सचिवांना याविषयी पत्र लिहून गेल्या 3 दिवसात मंजूर झालेल्या जीआरची माहिती मागवली आहे.22 ते 24 जून या दोन दिवसात राज्यसरकारने एवढे जीआर कसे मंजूर केले आले, त्याविषयी राज्यपालांनी सविस्तर अहवाल मागवला आहे. सोमवारी (27) पत्र मिळाल्यानंतर आता राज्याच्या मुख्य सचिवांनी अतिरिक्त मुख्य सचिव (संस्था आणि व्यवस्थापन) यांना या दोन दिवसातल्या मंजून जीआरचा डेटा गोळात्र करण्यास सांगितलं आहे.
गेल्या आठवड्यात पाच दिवसात तब्बल 280 सरकारी आदेश जारी करण्यात आले होते. विकासाशी संबंधित कामांसाठी तिजोरीतून निधी उपलब्ध करुन देण्याची परवानगी देण्यासाठी जीआर काढला जातो. 21 आणि 22 जून या दोन दिवसात 135 जीआर राज्य सरकारने मंगळवारी (21 जून) आणि बुधवार (22 जून) अशा दोन दिवसांत तब्बल 135 शासन निर्णय काढले. यात सर्वाधिक जीआर पाणीपुरवठा आणि जलसंधारण विभागासह नवीन पाणीपुरवठा योजनांना मंजुरी, सिमेंट बंधाऱ्यांच्या अंदाजपत्रकीय किंमती दीडपट करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे.
पाच दिवसात 280 जीआर
20 जून - 30 जीआर
21 जून - 81 जीआर
24 जून - 58 जीआर
22 जून - 54 जीआर
23 जून - 57 जीआर
rajpal
bhagatshig
thakrey
cr
Cricketer
aajitpawar
स्थानिक बातम्या
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
- Tue 28th Jun 2022 08:03 am
ना.अमित शहा विरुद्ध निंदाजनक ठरावासह मुकधरणे आंदोलन संपन्न
- Tue 28th Jun 2022 08:03 am
सातारा जिल्ह्यात 23 डिसेंबरपासून क्षयरूग्ण शोध मोहिम; सर्वेक्षणासाठी 160 पथके
- Tue 28th Jun 2022 08:03 am
पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
- Tue 28th Jun 2022 08:03 am
बोरगाव पोलीसानी ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा 24 तासांचे आत केला जेरबंद
- Tue 28th Jun 2022 08:03 am
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Tue 28th Jun 2022 08:03 am
संबंधित बातम्या
-
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
- Tue 28th Jun 2022 08:03 am
-
येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मी तुमच्या सोबत : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
- Tue 28th Jun 2022 08:03 am
-
उंब्रज येथुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील सध्याच्या भराव पुला ऐवजी भागनिहाय पारदर्शी पुल उभारावा,
- Tue 28th Jun 2022 08:03 am
-
माण चे आमदार जयकुमार गोरे कॅबिनेट मंत्री!
- Tue 28th Jun 2022 08:03 am
-
श्री प्रदीप झणझणे यांची फलटण भाजपामधून हकालपट्टी श्रीअमोल सस्ते
- Tue 28th Jun 2022 08:03 am
-
साखरवाडी ता. फलटण येथिल ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र
- Tue 28th Jun 2022 08:03 am
-
रणजितसिंह निंबाळकरांकडून फलटण नगरपरिषदेचे अधिकारी धारेवर..सर्वच विभागांमध्ये भोंगळ कारभार !
- Tue 28th Jun 2022 08:03 am
-
जमिन आणि पाण्यावर उतरणारी व उड्डाण घेणारी सी प्लेनची सुविधा निर्माण करावी..श्री.छ.खा.उदयनराजे
- Tue 28th Jun 2022 08:03 am