एल.बी.एस कॉलेजच्या प्रथमेश माने चे राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये यश

 सातारा  : लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा खेळाडू प्रथमेश संजय माने बारावी सायन्स यांनी भुसावळ येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे. या स्पर्धा इंडियन पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्यामार्फत घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विविध वजनी गटामध्ये एकूण 400 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता प्रथमेश माने यांनी 105 के.जी. वजन गटात बेन्च आणि डेडलिफ्ट असे एकूण  304 किलोग्रॅम वजन उचलून महाराष्ट्रात  प्रथम क्रमांक मिळविला. या खेळाडूला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले तसेच प्रा. मेजर मोहन वीरकर, प्रा. डॉ. विकास जाधव, प्रा. शिरीष ननवरे यांचे मार्गदर्शन लाभले.
 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या मा.सौ. शुभांगी गावडे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक तवर, ज्यु. विभाग प्रमुख सौ. व्ही.एस.शिंदे व प्रा.सुनील शिंदे तसेच सर्व प्राध्यापक बंधू भगिनी,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी या  सर्वांनी त्याच्या या उत्तुंग यशासाठी  अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त