लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयास बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण यश....

 सातारा :  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या बॉक्सिंग मुला-मुलींच्या स्पर्धा शहाजी कॉलेज कोल्हापूर यांनी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा मध्ये सातारा, सांगली,कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामधील बॉक्सिंग खेळाडूंचा सहभाग होता.या स्पर्धेमध्ये 210 बॉक्सिंग मुला मुली खेळाडूंचा सहभाग या ठिकाणी होता.या स्पर्धेमध्ये लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील B Sc. 2 मध्ये शिकत असलेली कुमारी रिशिका होले हेने सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच B.A. 2मध्ये शिकत असलेली कुमारी गीता बसागी हिने सुवर्णपदक प्राप्त केले तसेच M.A.1 मध्ये शिकत असलेली यशस्वी धनवडे यांनीही सुवर्णपदक प्राप्त केले त्याचप्रमाणे मुलांच्या मध्ये M.A.1 मध्ये शिकत असलेला अनुज कांबळे याने सुवर्णपदक प्राप्त केले तसेच B.Sc.2 मध्ये शिकत असलेला अंगज  वाघडोळे याने सिल्वर पदक प्राप्त केले तसेच B.Sc.1मध्ये शिकत असलेला सुभाष कदम यांनी ब्राँझ मेडल प्राप्त केले या सर्व विजयी खेळाडूंची निवड शिवाजी विद्यापीठाच्या बॉक्सिंग संघामध्ये करण्यात आले आहे.
 शिवाजी विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या इंटर झोनल बॉक्सिंग स्पर्धेमधून विजयी खेळाडू हरयाणा (रोहतक) या ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ तसेच उपप्राचार्य  डॉ.अशोक तवर डॉ. सी.पी. माने जिमखानातील सर्व सदस्य, शिक्षिकेतील कर्मचारी वर्ग सर्व विद्यार्थी यांनी विशेष कौतुक केले. या विजयी खेळाडूंना जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव श्री प्रकाश महाडिक तसेच सातारा बॉक्सिंग अकॅडमी चे मार्गदर्शक श्री.सागर जगताप सर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त