चि.पार्थ साळुंखेची जागतिक युवा आर्चरी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी..

सातारा : सातारा शहराजवळील शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश मीडियमच स्कूलचा माजी विद्यार्थी चि.पार्थ सुशांत साळुंखे याने आर्यलँड येथील लिमरीक येथे संपन्न झालेल्या जागतिक युवा आर्चरी स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात पार्थ बरोबर हरियानाची रिद्धी फोर या दोघांनी मिळून कांस्य पदकाची  तर वैयक्तिक स्पर्धेत चि.पार्थ साळुंखे याने सुवर्णपदकाची जागतिक कामगिरी करुन तो जुनिअर वर्ल्ड चॅम्पियन बनला...
  चि.पार्थ साळुंखे हा हरियाना मधील सोनिपथ येथे प्रशिक्षण घेत असून त्याचे तेथील प्रशिक्षक राम अवदेस यांच्या मार्गदर्शनात त्यांचा नियमित सराव सुरु असतो..त्याच्या आज  प्रयत्नच्या यशश्वी कामगिरी केल्यामुळे त्याची आर.बी.आय.मध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून निवड झाली आहे..
   त्याची अंतिम लढत  कोरियाचा सॉग इन जून या खेळाडूशी झाली..त्याच  लढतीत चि.पार्थ साळुंखे याने ७-३ गुणांनी बडत घेतली..आणि त्याने भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली...चि.पार्थ साळुंखे  हा खेळाडू साता-या जवळील करंजेपेठचा रहिवशी असून त्यांचे वडील सुशांत साळुंखे हे त्यांचे मार्गदर्शक आणि श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ सातारा मध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून सेवारत आहेत तर त्याच्या आई सौ.अंजली साळुंखे या त्याच विद्यालयात ग्रंथपाल म्हणून सेवा बजावत आहेत..
    पार्थच्या यशाबद्धल शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तुषार पाटील यांचाही मोलाचा वाटा आहे .त्यांच्याच मार्गदर्शना खाली आज शिक्षण प्रसारक संस्थेची आर्चरी अकॅडमी सुरु आहे..संस्थेच्या कोणत्याही शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला तेथे मोफत प्रशिक्षण मिळते सदर अकॅडमीचा पार्थ साळुंखे हा आदर्श खेळाडू आहे...तर त्याचे वडील सुशांत साळुंखे हे तेथे मार्गदर्शक म्हणून काम करित असतात..
   पार्थच्या अनमोल यशाबद्धल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार,उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप,कार्यक्षम सचिव तुषार पाटील, स्कूल कमेटी चेअरमन वत्सलाताई डूबल,संचालक अॅड.प्रतापराव पवार,चंद्रकांत पाटील,अॅड भीमराव फडतरे संचालिका हेमकांची यादव, प्रतिभा चव्हाण, संचालक धनंजय जगताप,रविंद जाधव आणि मान्यवर आजी माजी संस्था संचालक आणि सदस्य व सर्व हितचिंतक आणि सर्व सातारावासीय चि.पार्थ साळुंखेच्या यशाबद्धल कौतुक करित आहेत..

रँकिंग राऊंडमध्ये पार्थने ७व्या मानांकित साँग इन जूनविरुद्धच्या पाच सेटच्या अटीतटीच्या सामन्यात ७-३ ( २६-२६, २५-२८, २९-२६, २९-२६, २८-२६) असा विजय मिळवला. पार्थच्या यशात त्याच्या वडिलांचे खूप मोठे योगदान आहे. २०१२ मध्ये पार्थच्या प्रशिक्षकाने अचानक त्याची साथ सोडली. वर्षभर पार्थकडे प्रशिक्षकच नव्हता आणि त्याचा खेळावर परिणाम झाला. त्यामुळेच त्याच्या वडिलांनी ही जबाबदारी घेतली. पार्थचे वडील किक बॉक्सर होते आणि त्यांनी यू ट्यूबवर तिरंदाजी शिकली आणि त्यानंतर मुलाला शिकवले. २०१८च्या खेलो इंडिया स्पर्धेतील टॅलेंट स्काऊटची पार्थवर नरज पडली आणि तेथून तो साई  सेंटरमध्ये गेला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त