राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धे करता सातारची कन्या कु. समृद्धी शिंदे ची महाराष्ट्र संघात निवड

सातारा  : सातारा शहरातील राधिका रोड वरील शिंदे मळा या ठिकाच्या सामान्य कुटुंबातून आलेली कु.समृद्धी सतीश शिंदे बॉक्सिंग मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले आहे 
दिनांक 8 ते 10 मार्च 2024 दरम्यान अकोला येथे झालेल्या  सब ज्युनिअर मुले व मुली राज्य निवड चाचणी बॉक्सिंग  स्पर्धेमध्ये साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी  पोलीस हवालदार श्री सतीश राजाराम शिंदे यांची कन्या कु.समृद्धी सतीश शिंदे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला आहे. या कामगिरीच्या जोरावर तिची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धे करता महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. 

दिनांक 18 ते 262024 मार्च  दरम्यान नोएडा उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या 3 ऱ्या सब ज्युनिअर मुले व मुली राष्ट्रीय बॉक्सिंग  स्पर्धे मध्ये तिची लढत होणार आहे


तिला बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप, क्रीडा शिक्षक सुधाकर गुरव यांचे मार्गदर्शन लाभले तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारकर, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, योगेश मुंदडा, हरीश शेट्टी, जगन्नाथ जगताप, रवींद्र होले, अमर मोकाशी , शालाप्रमुख एकनाथ बोरसे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा दिल्या

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त