पार्थच्या साळुंखेच्या यशात त्याच्या पालकांचे योगदान महत्वाचे...नितीन तारळकर

सातारा :  सातारा शहराजवळील शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठचे नाव आर्चरी खेळ विभागात सातासमुद्रापार घेऊन जाण्याचे काम न्यू इंग्लिश स्कूल करंजेपेठ साताराच्या माजी विद्यार्थ्यांने म्हणजे पार्थ साळुंखेने जागतिक युवा आर्चरी स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून आपल्या संस्थेबरोबर आपल्या भारत देशाचे नाव वाढविण्याचे अविस्मरणीय काम केले आहे..
  पार्थ सुशांत साळुंखेने केलेल्या अनमोल कामगिरी बद्धल अहोरात्र प्रयत्न करुन त्याला यशापर्यंत पोहोचविण्याचे काम केल्याबद्धल नीतिनजी तारळकर साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा यांच्या हस्ते पार्थचे आई वडील  सुशांत साळुंखे व अंजली साळुंखे यांचा यथोचित गौरव करण्यात आला तेंव्हा जिल्हा क्रीडा अधिकारी बोलत होते..त्यावेळी  व्यासपीठावर..शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार,उपाध्यक्ष नंदकिशोर जगताप, संस्थेचे कार्यक्षम सचिव तुषार पाटील, संचालिका प्रतिभा चव्हाण श्रीपतराव पाटीलचे शालाप्रमुख अमर वसावे,न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली शिंदे आणि मान्यवर उपस्थित होते..
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक  क्रीडाशिक्षक श्री यशवंत गायकवाड यांनी केले त्यांनी  पार्थ साळुंखेने मिळविलेल्या सुवर्णपदकाचा सविस्तर इतिवृत्तांत सांगितला तर सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीनजी तारळकर साहेब यांच्या कार्याची माहिती देऊन संस्था व शाळेच्या वतीने त्यांचा संस्था अध्यक्ष सदाशिव कुंभार यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला..
   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी अथक प्रयत्न करुन पार्थ साळुंखे याने जागतिक युवा आर्चरी स्पर्धेत मिळविलेले सुवर्णपदक फक्त सातारकरांसाठी नव्हे तर देशासाठी गौरवास्पद काम असल्याचे कथन करुन त्याच्या आई-वडिलांनीअनेक अड़ी अडचणींना सामोरे जात दिलेल्या पाठिंबामुळेच त्याचे हे यश आहे असे सांगून त्यांनी शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्व शाखांच्या कार्याचा गौरव करून भविष्यात शासनस्तरावरुन क्रीडाकार्यालयाच्या वतीने मदत मिळवून देण्याचे घोषित केले..
  त्यांचेनंतर संस्थेच्या संचालिका प्रतिभा चव्हाण यांनी पार्थ साळुंखेच्या यशाचा पाढाच कथन केला.. पार्थने मिळविलेली यश त्याने केलेल्या अपार कष्टाचे फलित असल्याचे सांगताना त्याचे वडील सुशांत साळुंखे आणि आई अंजली साळुंखे यांनी घेतलेल्या कष्टाचे प्रतीक आहे हे कथन करताना संस्थेचे कार्यक्षम सचिव तुषार पाटील यांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनाचे आणि पाठींब्याचे विशेष कौतुक केले ..त्यांच्या पाठींब्यामुळेच संस्थेच्या सर्व शाखा अतिशय उत्तम पद्धतीने कार्य करीत असल्याचे सांगितले..
  त्यांचे नंतर पार्थच्या आई-वडिलांचा प्रमुख पाहुणे नितीनजी तारळकर साहेब यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला तर सातारा जिल्ह्याच्या इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात १६६ वी आलेली आराध्या डोनर आणि शिष्यवृत्ती विभाग प्रमुख कोळी मॅडम यांचाही सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर सन २०२३ मध्ये इयत्ता दहावी व बारावी मध्ये यशस्वी झालेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..
    सत्काराला उत्तर देताना पार्थचे वडील व त्याचे मार्गदर्शक सुशांत साळुंखे यांनी पार्थच्या यशाच गमक उलगडून सांगितले संस्थेचे सचिव तुषार पाटील यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि कठीण प्रसंगी त्यांनी दिलेल्या आर्थिक पाठींब्यामुळेच आम्ही पुढे जाऊ शकलो असे सांगितले तुषार पाटील यांनी आर्चरी  खेळाडूंसाठी मैदानाची उपलब्धता करून दिली. वेळप्रसंगी त्यांनी स्वतःच्या शेतात जागा उपलब्ध करून दिली असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले आत्तापर्यंत  शेकडो विद्यार्थ्यांचा सराव घेऊ शकलो अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवू शकलो असे कथन केले..  पार्थच्या यशाच्या पहिल्या टप्प्यातच त्याच्या तथाकथित मार्गदर्शकाने पाठ फिरविली असताना.. यूट्यूबच्या माहितीवरुन तसेच अनेक माहितगार व्यकतींच्या मिळालेल्या सल्ल्याने अथक प्रयत्न करुन यश मिळविले असल्याचे सांगितले यापुढे पार्थ स्वप्न ऑलिंपिक स्पर्धा गाजवण्याचे असेल असे त्यांनी कथन केले आणि आपल्या वाणीला पूर्णविराम दिला..
   संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गौरी पवार यांनी केले तर आभार विद्यालयाचे शालाप्रमुख श्री अमर वसावे यांनी मानले आणि विद्यालयाच्या शिक्षिका वृषाली कुंभार यांच्या आवाजातील सुमधुर वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त