महाबळेश्वर तालुक्यात प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न

महाबळेश्वर: शिक्षण विभाग पंचायत समिती महाबळेश्वरच्यावतीने शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर इ.४ थी व ७ वीतील विद्यार्थ्यांसाठी ३०० गुणांची प्रज्ञाशोध परीक्षा तालुक्यातील १५ केंद्रांवर संपन्न झाली..

तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी आणि शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी सहाय्यभूत व्हावे, यासाठी सदरच्या परीक्षेचे आयोजन पंचायत समितीच्या सेस फंडातून करणेत आल्याचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांनी सांगितले.

प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शिष्यवृृत्ती परीक्षेच्या अनुषंगाने पूर्वतयारी होत असून विद्यार्थ्यांमधील स्पर्धा परीक्षेसंदर्भात असणारी भीती कमी होण्यास मदत होते तसेच या परीक्षेमुळे शिष्यवृृत्तीची टक्केवारी वाढण्यासाठी  चांगला फायदा महाबळेश्वर सारख्या दुर्गम तालुक्याला होत असलेचे मत गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संवर्धनासाठी प्रज्ञाशोध परीक्षा प्रभावी माध्यम असलेने सर्व शिक्षक व पालक यांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदरची परीक्षा उपयुक्त ठरत असलेब्बतचा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे..

परीक्षेच्या यशस्वितेसाठी संतोष ढेबे, वसीम वारुणकर,अमोल कुंभार, अविनाश हजारे, तानाजी नगरे, एकनाथ जावळे यांचेसह सर्व केंद्रसंचालक, प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रसमन्वयक, विशेष शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त