कुस्ती प्रशिक्षक कोमल गोळे यांना महाराष्ट्र राज्य श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर…

म्हसवड ;  माण देशी चॅम्पियनच्या कुस्ती कोच कोमल गोळे यांना महाराष्ट्र राज्य श्रीशिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्याचा माण देशी फौंडेशनच्या वतीने सत्कार समारंभ घेण्यात आला.कोमल गोळे या 2020 व 21 सालच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत.
कोमल गोळे यांनी वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला कुस्तीपटू आहेत. खरंतर कोमल यांनी वयाच्या 20 व्या वर्षी कुस्ती खेळायला सुरुवात केली.
त्यांनी त्यांच्या कारर्किर्देत बऱ्याच स्पर्धामध्ये भाग घेऊन अनेक सुवर्ण पदके व कांस्यपदके मिळवली आहेत. त्यांचा डिप्लोमा इन स्पोर्ट कोचिंग ऍडमिशन (NIS ) हा कोर्स पटियाला येथे पूर्ण झालेला आहे.
कोमल यांच्या घरातील कोणीही कुस्ती खेळत नव्हते तरी सुद्धा कोमल यांना खेळाची खूप आवड असल्यामुळे त्या यां क्षेत्रात आल्या. पण या क्षेत्रात आल्यावर त्यांना बरेच चढ उतार आले पण त्यांनी यां सगळ्या वर मात करून हे यश मिळवले आहे. भविष्यात त्यांचे असे स्वप्न आहे कि माण देशी चॅम्पियनसच्या खेळाडूंनी भारताकडून प्रतिनिधित्व करावे.त्यांच्या पुढील वाटचालीस माण देशी फौंडेशन च्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त